Ad will apear here
Next
‘आधारकार्ड अभियाना’ची मोहिम महिनाभर वाढविण्याची मागणी
पिंपरी : महापालिकेतर्फे सर्व क्षेत्रीय कार्यालयात दोन दिवसीय ‘आधार नोंदणी व दुरुस्ती विशेष अभियान’ राबविण्यात आले होते. नागरिकांच्या सोईसाठी ही मुदत महिनाभर वाढविण्यात यावी, अशी मागणी स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे यांनी केली आहे.  या संदर्भात पुण्याचे जिल्हाधिकारी सौरव राव, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व सहाय्यक आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे.

नगरसेवक केंदळे यांनी दिलेल्या निवेदनात की, ‘पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे सर्व क्षेत्रीय कार्यालयात नवीन आधारकार्ड व दुरुस्तीसाठी दोन दिवसीय विशेष अभियान राबविण्यात आले असून त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसादही मिळाला. हे अभियान संपल्यानंतरही नवीन नोंदणी व दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून नोंदणी अधिकारी ठराविक नागरिकांचे अर्ज जमा करत आहेत. त्यामुळे नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडत आहे.’

निवेदनात पुढे म्हटले आहे की, ‘आज प्रत्येक शासकीय व बिगर शासकीय कार्यालयात आधारकार्ड सक्तीचे असल्यामुळे नागरिकांना याची मोठ्या प्रमाणावर गरज भासत आहे; तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनाही शाळा व विद्यालयात शिष्यवृत्ती व प्रवेशासाठी आधारकार्ड महत्त्वाचे आहे. बऱ्याच नागरिकांनी आधारकार्ड काढले; परंतु त्यात दुरुस्ती असल्यामुळे त्यांना जागोजागी त्रास सहन करावा लागत आहे, तर काहींचे आधारकार्ड संपूर्ण पत्त्याच्या अभावामुळे त्यांना मिळालेलेच नाहीत.

अशाप्रकारच्या अडचणींना त्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या अभियानाची मुदत वाढवली, तर जास्तीत जास्त नागरिकांना आधार कार्डविषयी समस्या कमी करता येतील आणि महापालिकेतर्फे राबवित असलेले विशेष अभियान खऱ्या अर्थाने सफल होईल.’ शासनाकडून मुदत वाढवून घेण्यात यावी आणि किमान महिनाभर तरी हे विशेष अभियान राबविण्यात यावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी नगरसेवक केंदळे यांच्यासह भाजपा नेते बापू घोलप, उमेश घोडेकर, प्रशांत बाराथे, कौस्तुभ देशपांडे, श्रीकांत सुतार आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZTFBG
Similar Posts
सात लाख पुणेकर होणार आगीपासून सुरक्षित पुणे : राष्ट्रीय अग्नी सेवा सप्ताहानिमित्त पुणे महानगरपालिका (पीएमसी) आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) यांचे अग्निशामक विभाग आणि जागतिक पातळीवर विना नफा तत्वावर चालवल्या जाणाऱ्या सेफ किड्स फाउंडेशनने संयुक्तरीत्या शहरभरात आगीपासून सुरक्षित राहण्याबाबत जागृती कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला
पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र आयुक्तालय पुणे : ‘मंत्रिमंडळाच्या १० एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत पिंपरी-चवड शहरासाठी स्वतंत्र आयुक्तालय स्थापनेसाठी मंजुरी देण्यात आली. शहराची वाढती लोकसंख्या, नागरीकरण, औद्योगिकरण, शिक्षणसंस्था वाहनांची संख्या तसेच गुन्ह्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. या स्वतंत्र पोलीस आयुक्तालयासाठी
पिंपरी-चिंचवड येथे रक्तदान शिबिर पिंपरी : पिंपरी-चिंचवडचे शिल्पकार माजी महापौर नानासाहेब शितोळे यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन नगरसेवक भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, ‘अरविंद एज्युकेशन’च्या श्रीमती आरती, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, बबनराव शितोळे,
‘‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून शाश्वत विकासाचे नियोजन’ पुणे : ‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून (पीएमआरडीए) या परिसराच्या शाश्‍वत विकासाचे नियोजन करण्यात आले आहे. या भागातील नागरिकांना दर्जेदार पायाभूत नागरी सुविधा देण्यावर भर दिला आहे. ‘रिंगरोड’, ‘मेट्रो’, ‘टीपी स्कीम’ या प्रकल्पांमुळे महानगर क्षेत्राच्या विकासाचा वेग वाढणार आहे,’ अशी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language